Chinchwad

चिंचवडमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा

By PCB Author

December 26, 2018

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. तसेच चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना ब्लँकेट्‌स व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्म जागरण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख हेमंतराव हरहरे, खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, जेष्ठ नेत्या प्रतिभा लोखंडे, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विश्राम देव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कांता मोंढे, भीमा बोबडे, विजय शिनकर, गुरुकुलमच्या प्रधानाचार्य पूनम गुजर, प्रा. जगन्नाथ देविकर, गोपाळ कळमकर, रविंद्र प्रभुणे, अजित कुलथे, धनंजय शाळिग्राम, राघू चिंचवडे, राजन पाटील, स्वप्निल गावडे, सतीश अवचार, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, आचार्य सतिश अवचार, मारुती वाघमारे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. खासदार अमर साबळे व प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने सदाशिव खाडे यांचा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले. सूत्रसंचालन नंदू भोगले यांनी केले. तुकाराम चौधरी यांनी आभार मानले.