चिंचवडमध्ये भरदिवसा फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून सव्वालाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
639

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – भरदिवसा लॉक लावून बंद असलेल्या फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० ग्रॅम चांदिचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवार (दि.१) दुपारी १ ते ३ च्या दरम्यान चिंचवड स्टेशन येथील जगन्नाथ कॉम्पलेक्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.३३ येथे घडली.

याप्रकरणी घरमालक आशा अरुण सावदेकर (वय ५१, रा. जगन्नाथ कॉम्पलेक्स, चौथ्या मजला, फ्लॅट नं.३३, चिंचवड स्टेशन) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन येथील जगन्नाथ कॉम्पलेक्समधील फ्लॅट नं.३३ हा फिर्यादी आशा सावदेकर यांच्या मालकिचा आहे. सोमवार दुपारी १ ते ३ या दरम्यान त्यांचा फ्लॅट लॉक लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेले ३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० ग्रॅम चांदिचे दागिने आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन फरार झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.