Chinchwad

चिंचवडमध्ये बहिणीला मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बॅटने जबर मारहाण

By PCB Author

May 10, 2019

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – बहिणीला मारल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बॅटने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवडगावातील भिमनगर येथे घडली.

सागर भागवत सपकाळे (वय २६, रा. भिमनगर चेतना बियरबार समोर, चिंचवडगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन भगवान जगताप (वय ५०, रा. भिमनगर) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागर याच्या राहत्या घरासमोर आरोपी नितीन हा त्याच्या बहिणीला मारत होता. यावर सागर याने तुम्ही माझ्या बहिणीला का मारता असा जाब विचारला. यामुळे रागावलेल्या नितीन याने लाकडी बॅटने सागर याला जबर मारहाण करुन जखमी केले आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.