चिंचवडमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावले

585

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून फरार झाले. ही घटना मंगळवारी (दि. १८) चिंचवड संभाजीनगर येथे घडली.

याप्रकरणी छाया नंदकिशोर तोवर (वय ४२, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तोवर या पायी संभाजीनगर येथील त्यांच्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरा समोरील रोडवर जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी तोवर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यामध्ये मंगळसूत्रांचा काही भाग तुटून चोरट्याच्या हातात गेला. तर काही भाग रस्त्यावर पडला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.