Chinchwad

चिंचवडमध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

November 16, 2018

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एक नवविवाहित तरुणीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास चिंचवड येथील दळवीनगर परिसरातील घरात घडली.

कावेरी किसन गायकवाड (वय १९, रा. दळवीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी हिचा किसन गायकवाड या तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्या पतीसोबत चिंचवड दळवीनगर परिसरात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी कोणी नव्हते. अचानक त्यांनी तळेगाव  येथील त्यांच्या भावाला फोन करुन त्या आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. भाऊ गडबडीत कावेरीच्या घरी निघाला मात्र तोवर कावेरीने राहत्या घरातील छताच्या हुकला नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ घरी पोहचल्यावर हा प्रकार लक्षात आला. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.