Chinchwad

चिंचवडमध्ये धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन जीवेमारण्याची धमकी

By PCB Author

February 20, 2019

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तिघाजणांनी मिळून एका तरुणाला मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुण गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवार (दि.१९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथील प्रिमीयम प्लाझा समोर घडली.

भिमराव दिपक सरकटे (वय २०, रा. गणपती मंदिराजवळ, बलदेवनगर, थेरगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बगीरा, करण्या उर्फ किरण आणि नन्या (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी भिमराव हे त्यांनी केलेल्या ऑर्डरची डिलेव्हरी घेण्यासाठी चिंचवड येथील प्रिमीयम प्लाझा समोर गेले होते. यावेळी बगीरा, किरण आणि नन्या हे तिघे आरोपी देखील तेथून चालले होते. या तिघांतील एकाचा भिमराव याला धक्का लागला. यावर भिमरावने धक्का दिल्याचा जाब त्यांना विचारला. यावर तिघा आरोपींना राग आला त्यांनी भिमरावला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केले. तसेच त्यांच्या डोक्या सिमेंटचा गट्टू मारुन गंभीर केले. आणि जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.