चिंचवडमध्ये दुचाकी न दिल्याने वडिलांची मुलीला लोखंडी सळईने बेदम मारहाण

0
507

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – मुलीने दुचाकी दिली नाही म्हणून वडिलांनी मुलीला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार चिंचवड येथील केशवनगर येथे उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.  

या प्रकरणी मोनिका सुरेश माने (वय २८, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) हिने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश विठ्ठल माने (वय ६०, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका चिंचवड येथे नोकरीला आहेत. त्यांची अॅक्टिव्हा दुचाकी त्यांचे वडील सुरेश यांनी मागितली होती. परंतु मोनिका यांनी  दुचाकी देण्यास नकार दिला. या रागातून सुरेश यांनी मोनिकाला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर लोखंडी सळईने तोडांवर, पाठीवर, पोटावर मारहाण केली. या मारहणीमध्ये मोनिकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले.  अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.