Chinchwad

चिंचवडमध्ये दुचाकीवरुन घरी निघालेल्या तरुणाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण

By PCB Author

June 13, 2019

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – दुचाकीवरून घरी निघालेल्या एका तरुणाला तिघा जणांच्या टोळक्यांनी लाकडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना घटना सोमवारी (दि. १०) रात्री दहाच्या सुमारास लिंक रोड, पत्राशेड येथे घडली.

याप्रकरणी महेश दत्तात्रेय साळवे (वय २२, रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश दिलीप मगर, नरु ऊर्फ किश्या तांबे, छोटू शेख (सर्व रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास महेश हे पत्राशेड, लिंक रोड येथे एका टपरीवर चहा पिऊन त्याच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी आरोपी नरू याने त्यांना लाकडाच्या वखारीजवळ अडवले. आकाश याला दोन दिवसांपूर्वी का बोललास? अशी विचारणा करत तिघांनी मिळून महेश याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.