Chinchwad

चिंचवडमध्ये तरुणीची कॉलर पकडून शिवीगाळ करत धमकावल्याने आई आणि मुलाला अटक

By PCB Author

May 02, 2019

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – तरुणी आणि तिच्या बहिणीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन कॉलर पकडून बघून घेण्याची धमकी दिल्याने चिंचवड पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.

याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आई स्वरुपा लोढा आणि आरोपी मुलगा दर्शन लोढा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारला धडक दिल्याच्या कारणावरुन आरोपी दर्शन लोढा याने तरुणीच्या गाडीची चावी काढून घेतली. चावी घेतल्याची फिर्यादी यांनी विचारणा केली असता. आरोपी दर्शन लोढा याने अश्लील शिवीगाळ करत तू छपरी आहेस तुझ्यासारख्या थर्ड क्लास मुली खूप पहिल्या आहेत. अस म्हणत फिर्यादी तरुणीच्या टॉप (ड्रेस) च्या कॉलर ला पकडून जवळ ओढून घेत हाताला हिसका दिला. तेवढ्यात दर्शन लोढा याची आई स्वरुपा हिने तरुणीला आणि त्यांच्या बहिणीला अश्लील शिवीगाळ केली आणि आम्ही कायदा ओळखतो आमचे पोलीस ठाण्यात आणि कोर्टात रोजचे येणे जाणे आहे. तू आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करशील त्या पलीकडे काय करणार. तेव्हा आम्ही दोघे तुला बघून घेऊ अशी धमकी फिर्यादी यांना दिली. याप्रकरणी मुलगा दर्शन आणि त्याची आई स्वरुपा लोढा या दोघांना अटक करण्यात आली आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत.