चिंचवडमध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

0
707

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – चिंचवड येथील दवाबाजार, प्रेस्टीज क्लासीक प्लॅट नं.२१४ डी बिल्डींग येथे एका ६ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तिन महिन्यांपासून ते २७ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित ६ वर्षीय चिमुकलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार मोहसीन मोहमंद शेख (रा.प्रेस्टीज क्लासीक प्लॅट नं.२१४ डी बिल्डींग, दवाबाजार, चिंचवड) विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांपासून ते २७ सप्टेंबर २०१८ दरम्यान आरोपी मोहसीन याने वेळोवेळी तक्रारदार महिला यांच्या ६ वर्षीय चिमुकलीला चॉलेटचे आमिष दाखून त्याच्या घरी नेले तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत चिमुकलीच्या आईने निगडीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार आरोपी मोहसीन याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.