चिंचवडमध्ये घरफोडी करून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

0
641

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर येथे उघडकीस आली.

दत्तात्रय भगवान चिंचवडे (वय ३९, रा. ज्ञानदीप कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय १ ते ७ मे या कालावधीत गावी गेले होते. या दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. शयनगृहातील कपाटामधील १६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.