चिंचवडमध्ये गोमासाने भरलेला टेम्पो जप्त

0
769

पुणे, दि. ८ (पीसीबी) –  संगमनेर येथून मुंबईला गोमांस विक्रीसाठी जाणारा टेम्पो चिंचवड येथे बजरंग दलाच्या कार्यकत्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे चारच्या सुमारास करण्यात आली.  या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह १ टन गोमांस जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून रविवारी पहाटे चारच्या सुमारास गोमांसने भरलेला टेम्पो चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षकांना मिळाली होती. दरम्यान, या गोरक्षकांनी चिंचवड चौक येथे टेम्पो थांबवला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन टेम्पोचालक मोहम्मद तन्वीर यकीन अली शेख व मोहम्मद जमाल गफूर कुरेशी यांची चौकशी केली. गावातील मोहसीन नावाच्या व्यक्तीने गोमांस टेम्पोत भरून मुंबई येथील शहनवाज कुरेशी यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.

कारवाईदरम्यान, कसाई आणि त्याला मदत करणारा मोहसीन, शेतकरी, शहनवाज कुरेशी, टेम्पो चालक व  मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित १९९५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.