Chinchwad

चिंचवडमध्ये गॅसकटरने एटीएम फोडले; १० लाखांच्या नोटा जळून खाक

By PCB Author

July 23, 2018

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडत असताना एटीएम मशीनला आग लागल्याने मशीन मधील तब्बल १० लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत. ही घटना चिंचवडमधील स्टेट बँकेच्या ऑफ इंडियाच्या संभाजीनगर येथील एटीएमवर रविवारी (दि.२२) पहाटे झाली.

याप्रकरणी सचिन शिवकिरण काळगे (वय ३५, रा. बापूजी बुवानगर, थेरगाव) यांनी निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील साई उद्यानासमोर स्टेट बँकेच्या ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर आहे. रविवारी रात्री उशीरा काही अज्ञात चोरट्यांनी येथील एटीएम मशीन गॅसकटरच्या सहाय्याने कापून त्यातील रोकड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅसकटरमुळे एटीएम मशीनने पेट घेतला आणि त्यातील तब्बल १० लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. निगडी पोलिस तपास करत आहेत.