Chinchwad

चिंचवडमध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता राबवून प्लास्टिक बंदीची जनजागृती

By PCB Author

October 02, 2018

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ब’प्रभाग अंतर्गत चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी चापेकर चौक येथून गांधी पेठ मार्गे फेरी काढून प्लास्टिक बंदीची जनजागृती करण्यात आली. व्यापारी आणि नागरिकांना प्लास्टिकचे महत्व पटवून देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र महावितरण सदस्य मधुकर बच्चे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, विठ्ठल भोईर, दत्ता चिंचवडे, दत्ता भोईर, मुख्य आरोग्य अधिकारी, पारोल साहेब, कांचनकुमार इंदलकर, सर्व सफाई कर्मचारी परिसरातील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मंडळे आदी सहभाग झाले होते.