Notifications

चिंचवडमध्ये गँगवॉर; आकाश लांडगे खून प्रकरणातील संशयितावर कोयत्याने खुनी हल्ला

By PCB Author

December 17, 2018

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिंचवड येथील आकाश लांडगे खून प्रकरणातील संशयीत आरोपी सिध्देश शेलार याच्यावर पाच जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात सिध्देश गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१६) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगणात घडली.