चिंचवडमध्ये आत्याच्या मुलाने केले तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

0
754

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाच्या आत्याच्या मुलानेच त्याच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.१) दुपारी अडीचच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगरमध्ये घडली.

मारुती राजु धोत्रे (वय २६, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे ब्लेडचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यानुसार आरोपी शुंकर परशुराम कुऱ्हाडे (वय २६, इंदिरानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मारुती याचे त्याच्या अत्याच्या मुलगा शंकरसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर मारुती आपल्या घरी जाऊन झोपी गेला. दुपारी अडीच्या सुमारास आरोपी शंकर मारुतीच्या घरी गेला. मारुती झोपल्याचे पाहून त्याने त्याच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार करुन पसार झाला. या घटनेत मारुती गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी शंकर याला अद्याप अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.