Chinchwad

चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती शरीरसंबंध; मुलगी राहिली गर्भवती; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By PCB Author

March 25, 2019

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवले. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. या तरुणाविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडित मुलीच्या ४६ वर्षीय आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, महेश गपाट (रा. मुंजोबा कॉलनी शेजारी, चिंचवडेनगर) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश आणि पिडित अल्पवयीन मुलगी हे एकाच परिसरात राहतात. महेश याने डिसेंबर २०१८ दरम्यान मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्ती शरीर संबंध ठेवले. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार मुलीच्या आईला समजला. त्यांनी तातडीने चिंचवड पोलीस ठाणे गाठून आरोपी महेश विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, महेश याच्यावर पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.