चिंचवडमधील मोरया गोसवी मंदिरात पवना नदीच्या पुराचे पाणी शिरले

0
661

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज (सोमवार) दिवसभर मावळ परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने पवना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून चिंचवडमधील मोरया गोसवी मंदिरात संध्याकाळी पुराचे पाणी शिरले.

मंदिर परिसरात पाणी आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना मंदिरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, मंदिरात शिरलेले पाणी आणि पवना नदीचा पूर बघण्यासाठी नागरिकांनी भर पावसात गर्दी केली. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास मंदिर पुराच्या पाण्यात पूर्णपणे बडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.​