चिंचवडमधील प्रतिभा कॉलेजमध्ये स्वीप उपक्रमातर्गत मतदानाबाबत जनजागृती

0
595

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून स्वीप उपक्रमातर्गत चिंचवडमधील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अन्ड कॉम्पुटर स्टडीज व जुनियर कॉलेज येथे आज (बुधवार) मतदानाविषयी नागरिकांचे प्रबोधन व जनजागृती  करण्यात आली.

यावेळी विद्यार्थांना व कर्मचा-यांना मतदान करणेबाबत व इतरांना मतदानास  प्रवृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करुन शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला सेक्रेटरी, डॉ.दिपक शाह, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य-डॉ.वनिता कु-हाडे, कार्यक्रम अधिकरी अरविंद बोरणे, संचालक डॉ. आनंद लुकंड  पांडुरंग इंगळे  आदी उपस्थित होते.

१०० टक्के मतदान होईल यादृष्टीने सर्व मतदारांशी संपर्क साधुन मतदानास प्रवृत्त व मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करण्यासाठी  कक्ष प्रमुख सुनिल वाघमारे यांनी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सुचना दिल्या.  यावेळी कक्ष प्रमुख मुकेश कोळप, तानाजी सावंत, सुशांत जोशी आदी उपस्थित होते.