चिंचवडमधील गरवारे फायबर्स कंपनीमध्ये ‘योगदिन’ साजरा

0
538

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – येथील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय ‘योगदिन’ साजरा करण्यात आला. पंतजली योग समितीचे योग शिक्षक प्रेमचंद शिंदे, राजेंद्र गायकवाड यांनी  सर्वांना मार्गदर्शन केले.

आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या बाह्य घटणांवर आपण नियंत्रण नाही, ठेऊ शकत. पण आपल्या अंतर्मनात जे काही घडत असत त्यावर आपण नक्कीच नियंत्रण आणू शकतो..! याकरिता गरज आहे नियमित योगाभ्यास व प्राणायामाची….!”

गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन हा योगदिवस साजरा केला गेला. आपल्या तंदुरुस्त शरीरासाठी योगा हा एक महत्वपूर्ण व्यायाम प्रकार आहे..आपल मन,बुद्धी, व हृदय सशक्त आणि सुदृढ ठेवण्यासाठी ही एक उत्तम व खूप चांगली  थेरेपी आहे. यासाठी नियमित योगाभ्यास व प्राणायाम केल्यास आपण ताणतणाव व चिंतामुक्त, आरोग्यदायी जीवन जगू शकतो, हे आता सर्व जगाने मान्य केले आहे. गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपचा नेहमीच अशा, निरोगीमय जीवनाचा व सामाजिक उपक्रमाचा एक भाग असण्याचा प्रयत्न असतो..!

या कार्यक्रमात माधव ढमाले, शाम कुंभार, श्रीराम ठाकरे, सतीश तारू, विलास पाटील, मल्लाप्पा बिरादार, आण्णा पाटील व अनिल घुगे यांनी सहभाग घेतला.