चिंचवडगावात जुगार अड्ड्यावर धाड; पाच जणांना अटक

0
1551

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चिंचवड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १८) रात्री आठच्या सुमारास चिंचवड गावातील वेताळनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

महादेव कल्लाप्पा कांबळे (वय ५०, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड), डॉमनिक जॉन जोसेफ (वय ३६, रा. आम्रपाली सोसायटी, ओटास्किम, निगडी), विजयकुमार दयाराम दास (वय ४३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), वैभव शिवाजी पवार (वय ३३, रा. पवार नगर, काळेवाडी), नितीन ज्ञानोबा काळे (वय २८, रा. चाफेकर चौक, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री चिंचवड पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून वेताळ नगर झोपडपट्टी जवळ मोरया हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर सातच्या समोर काही लोक जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून वरील पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, महादेव आणि डॉमनिक हे दोघेजण मुंबई मटका नावाच्या जुगाराच्या चिठ्ठ्या देत होते. तर विजयकुमार, वैभव आणि नितीन हे मटका घेत होते. या सर्वांकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर मुंबई जुगार अॅक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.