Chinchwad

चिंचवडगावातील सावित्रीबाई शेडगे-पाटील यांचे निधन

By PCB Author

November 10, 2018

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – चिंचवडगावातील श्रीमती सावित्रीबाई बबनराव शेडगे-पाटील (वय- ९४) यांचे  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ  नेते व माजी सरपंच पै. ज्ञानेश्वर शेडगे, टाटा मोटोर्स युनियनचे कार्याध्यक्ष शिवाजी शेडगे यांच्या मातोश्री व पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या त्या आजी होत.

चिंचवडगावातील भजन किर्तन या धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा कायम सहभाग असायचा. वाढत्या वयोमानामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. अखेर झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.