Pune Gramin

चाळकवाडी टोलनाका बंद पाडल्याने मनसे आमदार सोनवणे वर गुन्हा दाखल

By PCB Author

July 15, 2018

जुन्नर, दि. १५ (पीसीबी) – रस्त्याचे काम अपूर्ण असूनही टोलवसुली सुरु असल्याने, मनसेचे जुन्नरचे  आमदार शरद सोनवणे यांच्यावर पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका बंद पाडल्याने गुन्हा दाखल झाला आहे. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळे फाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

शुक्रवारी (दि.१३) सोनवणे आणि दीडशे कार्यकर्त्यांनी चाळकवाडी टोलनाका टोल नाका बंद केला होता. जमावबंदी झुगारून केलेल्या आंदोलनामुळे मुंबई कायद्यानुसार आणि कलम १४३ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्याचे अपूर्ण काम असताना टोल आकारला जात असल्याने  मनसेने आक्रमक होत काल टोलवसुली बंद पाडली होती.