चालत्या गाडीत फेसबूक लाईव्ह करताना अपघात होऊन दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू

0
497

नागपूर, दि.१७ (पीसीबी) – सध्या सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. या सोशल मीडियाने नागपूरात एकाचा बळी घेतला आहे. नागपूरच्या काटोलमध्ये चालत्या गाडीत फेसबूक लाईव्ह करताना अपघात होऊन २ भावांचा मृत्यू झाला, तर अन्य ७  जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अपघातानंतही फेसबूक लाईव्ह काही काळ सुरूच होते.

हा अपघात १७  जून रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात झाला. पुंकेश पाटील कार चालवत होता, तर त्याचा भाऊ संकेत पाटील मोबाईलवरून फेसबूक लाईव्ह करत होता. चालत्या कारमध्ये फेसबूक लाईव्ह करत असतानाच दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात पुंकेश पाटील आणि त्याचा भाऊ संकेतचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. पुंकेशच्या फेसबूक अकाऊंटवरुन हे फेसबूक लाईव्ह सुरू होते.

काही महिन्यांपूर्वी वेणा डॅममध्ये फेसबूक लाईव्ह करताना नाव पलटली होती. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारे रामा डॅममध्येही सेल्फीच्या नादात अपघात झाला आणि तरुणांचा जीव गेला होता.