Pimpri

चालक लघुशंकेसाठी खाली उतरला अन पॅसेंजरने कार पळवली

By PCB Author

October 21, 2020

वाकड, दि. २१ (पीसीबी) – पॅसेंजरला घेऊन जात असताना कार चालक लघुशंकेसाठी खाली उतरला. त्यावेळी पॅसेंजरने कार आणि कारमधील चालकाचा मोबईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेअकरा वाजता वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ घडली.

सलीम अहमद शेख (वय 30, रा. मलबार हिल, मुंबई) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोजेश रंगराव खंडारे (वय 32, रा. जेएनपीटी रोड, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांच्या कार (एम एच 01 / सी जे 1895) मध्ये आरोपी रोजेश हा पॅसेंजर म्हणून बसला होता. वाकड सर्विस रोडवर, जंजीर हॉटेल जवळ शेख लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. त्यावेळी शेख यांचा मोबईल फोन कारमध्येच होता. शेख कारमधून खाली उतरल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी रोजेश याने शेख यांची 2 लाख 55 हजारांची कार आणि 5 हजारांचा मोबईल फोन चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.