चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

0
391

थेरगाव, दि. ७ (पीसीबी) – माहेराहून पैसे आणावेत, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पवारनगर, थेरगाव येथे घडली.

पती अतुल दिलीप ननावरे (वय 41), सासरे दिलीप ननावरे (वय 65), सासू (वय 62) व दोन नणंद (सर्व रा. पवारनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने गुरुवारी (दि. 7) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जुलै 2020 ते 6 मे 2021 या कालावधीत घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता यांनी माहेराहून पैसे आणावेत, तसेच चारित्र्याबाबत संशय घेऊन विवाहितेचा छळ केला. तसेच वेळोवेळी शिवीगाळ करून बेदम मारहाणही केली. फिर्यादी या घाणरेड्या आहेत. तिची वागणूक चांगली नाही, अशी नातेवाइकांमध्ये बदनामी केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.