चातु:शृंगी पोलीसांकडून बाणेर येथे गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
462

 

पुणे, दि.३ (पीसीबी) – करोनामुळे आरोग्य आणि पोलीस विभागावर प्रचंड ताण आलेला आहे. दोन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे.

कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसही पुढे आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस मुळे शासनाने दिलेल्या आदेशाने सर्व सामान्य परिवाराच्या मदतीच्या स्वरूपात पुणे येथील फुकटवस्ती बाणेर येथे गरजू महिलांना चातु:शृंगी पोलीस स्टेशनचे Acp लक्ष्मण बोराटे , पोलिस अधिकारी अनिल शेवाळे,पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश आव्हाड आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडून फुलाची पाकळी म्हणून जीवनावश्यक वस्तू किराणा राशन व भाजीपाला या वस्तूचे वाटप केले.

माझ्या महिला भंगिनिना छोटीशी मदत. सहकार्य तर कायमच रहाणार असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

यावेळी चातुःशृंगी पोलिस स्टेशनचे Acp लक्ष्मण बोराटे, पोलिस अधिकारी अनिल शेवाळे, पोलिस हेडकोन्स्टेबल प्रकाश आव्हाड आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.