चाकण हिंसाचार प्रकरणी ५ हजार जणांवर सामूहिक गुन्हे दाखल

0
1558

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (दि.३०) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या तब्बल ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हिंसाचारात सहभागी लोकांवर दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

सोमवारी चाकणच्या मुख्य चौकात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होते. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवले त्यानतंर अचानक एकाने पुणे-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या बसच्या दिशेने दगड भिरकवला आणि त्यानंतर मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाल्या, हवेत गोळीबार केला तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने लाठी चार्ज देखील करण्यात आला होता. याघटने मध्ये सरकारी आणि खाजगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.