चाकण येथे पावनेसोळा लाखांची वीजचोरी केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

0
517

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्ये (वय ४९, रा. कोथरूड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषीकेश चंद्रकांत झगडे (सर्व रा. झगडे वस्ती, चाकण) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश, योगेश आणि हृषीकेश या तिघांनी २४ जुलै २०१८ ते २५ जानेवारी २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीजचोरी केली. आणि ६५ हजार ३१० युनिट्सच्या विजेचा वापर केला. यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी या तिघा आरोपींविरोधात भारतीय विद्युत कायदा कलम १३५ अन्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.