Bhosari

चाकण येथे घातक कोयता बाळगणाऱ्या दोघांना अटक

By PCB Author

April 02, 2019

चाकण, दि. २ (पीसीबी) – घातपात करण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ धारदार कोयता बाळगणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवार (दि.१) रात्री दोनच्या सुमारास चाकण परिसरातील तळेगाव चौकात तळेगाव रोडवर करण्यात आली.

मोहित संजय साबळे (वय २६, रा. नेहरु चौक, चाकण) आणि त्याचा साथीदार सुरज सतिश काकडे (वय २१, रा. संत ज्ञानेश्र्वर शाळेसमोर, महर्षीनगर, स्वारगेट) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोनच्या सुमारास चाकण पोलीस चाकण परिसरातील तळेगाव चौकात तळेगाव रोडवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना मोहित आणि त्याचा साथीदार सुरज हा संशयीरित्या त्यांची दुचाकी (क्र.एमएच/१२/पीबी/१७१५) वर बसलेले आढळून आले. यावर पोलिसांनी त्यांच्यासह दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीमध्ये १०० रुपये किमतीचा घातक कोयता आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन मोहित आणि सुरजला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.