चाकण येथे ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू विक्री करणाऱ्या इसमाला अटक

0
2317

चाकण, दि. १० (पीसीबी) – ‘गायछाप’ या तंबाखू विक्री कंपनीचा ट्रेडमार्क वापरुन बनावट तंबाखू विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.९) चाकण पोलिसांनी खराबवाडी येथील मुकेश स्टेअर नावाच्या दुकानासमोर केली.

मोहनलाल चेलाराम चौधरी (रा.मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या व्यवसायीकाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात कॉपी राईट अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहनलाल चौधरी हा दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ विकतो. रविवारी चाकण पोलिसांना माहिती मिळाली कि, एक इसम खराबवाडी येथे बनावट तंबाखू विक्री करण्यासाठी येतो. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी मोहनलाल याला ताब्यात घेतले त्याच्या जवळील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ३ हजार १२० रुपये किमतीचे, मालपाणी ग्रुप या ‘गायछाप’ तंबाखु विक्री करणाऱ्या कंपनीचे बनावट ट्रेडमार्क वापरुन विकत असल्याचे समोर आले.  पोलिसांनी तो माल जप्त करुन आरोपी मोहनलाल याला अटक केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.