चाकण येथील नगरसेवकाला देशी कट्टा, मॅगझीन आणि काडतुसांसहित अहमदनगरमधून अटक

0
835

अहमदनगर, दि. १७ (पीसीबी) – चाकण येथील नगरसेवक आणि त्याच्या साथीदाराला एक देशी कट्टा, देशी पिस्टलचे मॅगझीन, दोन जिवंत काडतुस, दोन मोबाईल आणि एक फॉर्च्युनर कार असा २० लाख ५८ हजारांच्या ऐवजासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विळद घाट, निंबळक बायपास येथे केली.

राहुल किसन कांडगे (वय ३६, रा. जय भारत चौक, मार्केटयार्ड, चाकण) आणि अश्फाक महमंद शेख (वय ३४, रा. चाकण-कोरेगाव रोड, पिंपळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील आरोपी राहुल हा चाकण येथील नगरसेवक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती कि, मनमाड-नगर रोडवरुन नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर कारमधील व्यक्तीकडे देशी कट्टा आहे. यावर पोलिसांनी विळद घाट, निंबळक बायपास येथे नाकाबंदी करुन ती कार थांबवली. कारमध्ये राहुल आणि अश्फाक दोघे होते. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी कट्टा, देशी पिस्टलचे मॅगझीन, दोन जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन दोघांना अटक केली. चौकशी दरम्यान राहुल हा चाकण येथील नगरसेवक असल्याचे समोर आले. अहमदनगर पोलिस तपास करत आहेत.