चाकण येथील गोडावून मधून दीड लाखांची कॉपर केबल चोरट्यांनी केली लंपास

0
376

चाकण, दि. २१ (पीसीबी) – कंपनीच्या गोडावूनमध्ये ठेवलेली दीड लाखांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शनिवार (दि.१५) ते बुधवार (दि.१९) दरम्यान चाकण नाणेकरवाडीतील रोलेक्स मशीनरी या कंपनीच्या गोडावूनमध्ये घडली.

याप्रकरणी पराग राम शर्मा (वय ३४, रा. कल्पतरु हार्मणी सी ५०५, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पराग शर्मा हे व्यवसायीक आहेत. त्यांचा वेल्डींगचे साहित्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवार (दि.१५) ते बुधवार (दि.१९) दरम्यान त्यांनी त्यांच्या चाकण येथील रोलेक्स मशीनरी या कंपनीच्या गोडावूनमध्ये दीड लाख रुपये किमतीची ८० मिटर कॉपर वेल्डींग केबल ठेवली होती. ती केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.