Bhosari

चाकण येथील किराणा व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन मागीतली पाच लाखांची खंडणी

By PCB Author

November 25, 2018

चाकण, दि. २५ (पीसीबी) – अज्ञात खंडणीखोराने एका किराणा व्यवसायिकाच्या मोबाईलवर फोन करुन जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार (दि.११) सायंकाळी सात ते शनिवार (दि.२४) सायंकाळी साडेदहाच्या दरम्यान चाकण पोलीस ठाणे हद्दीतील पाईट येथे घडली.

याप्रकरणी किराणा व्यवसायीक देसाराम सोगाजी कुमार (वय ४५, रा. पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ८८७८१११०७६ आणि ९८२३९३४६७९ या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देसाराम कुमार यांचा पाईट येथे किराणा मालाचा व्यवसाय आहे. रविवार (दि.११) सायंकाळी सात ते शनिवार (दि.२४) सायंकाळी साडेदहाच्या दरम्यान ८८७८१११०७६ आणि ९८२३९३४६७९ या दोन मोबाईल क्रमांकांवरुन अज्ञात इसमाने देसाराम यांच्या मोबाईलवर फोन केला. तसेच त्यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली आणि ती न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी तांत्रीक तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. चाकण पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.