चाकण येथील कंपनीतून सव्वासात लाखांचे कॉम्प्रेसर पार्ट चोरी करणाऱ्या दोघांना अटक

0
618

चाकण, दि. १३ (पीसीबी) – चाकण कुरुळी येथील महाले वेअर इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचे के.एस.एच लॉजिस्टीक वेअर हाऊस मधून १ सप्टेंबर २०१८ ते १ डिसेंबर २०१८ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एकूण ७ लाख ४२ हजार ४६ रुपये किमतीचे १२५ कॉम्प्रेसर पार्ट चोरुन नेले होते. या गुन्ह्यातील दोघा आरोपींना चाकण पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे तब्बल ९ लाख १० हजार रुपये किमतीचे कॉम्प्रेसर पार्ट आणि ए.सी कंट्रोल पॅनेल जप्त करण्यात आले आहेत.