चाकण, भोसरी, वाकडमधून तीन दुचाकी चोरीला

0
431

चाकण, दि. १५ (पीसीबी) – चाकण, भोसरी आणि वाकड मधून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी परिसरातून एका इको कारचा सायलेन्सर काढून नेला आहे. याबाबत सोमवारी (दि. १४) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रणेश रामदास शिंगोटे (वय २९, रा. तळेगाव दाभाडे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंगोटे यांची २० हजारांची दुचाकी (एम एच १४ / सी आर ३६३७) अज्ञात चोरट्यांनी म्हाळुंगे येथील बजाज कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

मॅथ्यू ऍंथोनी दास (वय ४८, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची १५ हजारांची दुचाकी (एम एच १२ / एल एफ ६७३९) चोरट्यांनी कासारवाडी येथील फोर्ब्स मार्शल कंपनीच्या समोरील भिंतीजवळून चोरून नेली.

श्रीकांत रामराव आंबड (वय ३३, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आंबड यांची २५ हजार रुपयांची दुचाकी (एम एच १४ / ई एल २७५६) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

भोसरी परिसरात सायलेन्सर चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. लांडगे आळी मधून आणखी एका इको गाडीचा १० हजारांचा सायलेन्सर चोरून नेला आहे. याबाबत जयश्री अजित मोढवे (वय ३६, रा. लांडगे आळी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.