चाकणमध्ये सापडले स्त्रीजातीचे नवजात अर्भक

0
881

मोशी, दि. १९ (पीसीबी) – एका स्त्रीजातीचे नवजात अर्भक मोशीतील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्याजवळ आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना मंगळवार (दि.१८) सकाळच्या सुमारास समोर आली.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास आयआरबीचा कर्मचारी लघुशंकेसाठी इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर गेला होता. यावेळी त्याला तेथील प्लॅस्टिक पिशवीमध्ये काहीतरी वळवळ करताना दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्यामध्ये स्त्री जातीचे एक ते दोन दिवसाचे अर्भक आढळून आले. त्या अर्भकास साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवण्यात आले होते. याप्रकराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. चाकण पोलिसांनी या अर्भकास ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. चाकण पोलीस या अर्भकाच्या पालकांचा शोध घेत आहेत.