चाकणमध्ये सराफी दुकान फोडले; २८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

0
779

चाकण, दि. (पीसीबी) – सराफी दुकानाचे शटर उचकटून सुमारे २८ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने सराईत चोरट्यांनी लंपास केले. ही घटना चाकण (ता.खेड) येथील भांबुर्डेकर सराफी दुकानात शुक्रवारी (दि. १८) पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पाच चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याची ठुशी, बोरमाळ, पैंजण, जोडवे, देवांच्या मूर्त्यां, अंगठ्या, ब्रेसलेट, आदी किंमती दागिने असा एकूण २८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवले आहे. याप्रकरणी भांबर्डेकर सराफ दुकानाच्या मालकाने चाकण पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे- नाशिक महामार्गावरील चाकण गावाच्या हद्दीत माणिक चौकाजवळ भांबुर्डेकर यांचे अद्यावत असे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास पाच सराईत चोरट्यांनी दुकान फोडले. त्याआधी चोरट्यांनी दुकानाचे सायरन, सीसीटीव्ही बंद केले. अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.