Bhosari

चाकणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बालात्कार; तरुणी राहिली गर्भवती

By PCB Author

July 21, 2019

चाकण, दि. २१ (पीसीबी) – एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिला विविध ठिकाणी नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. यामुळे तरुणी गर्भवती राहिली. ही धक्कादायक घटना जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ दरम्यान खराबवाडी येथील विविध ठिकाणी घडली.

याप्रकरणी पिडित १८ वर्षीय तरुणीने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक गणेश राजगुरु (रा. चांदणी चौक, खराबवाडी, ता. खेड, मुळ रा. जुन्नर) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक या तरुणाने पिडित १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या दरम्यान खराबवाडी येथील त्याच्या घरी तसेच सातव इस्टेटच्या मागील बाजूस नेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. यामुळे तरुणी गर्भवती राहिली. ज्यामुळे सर्व प्रकार समोर आला. आरोपी अभिषेक याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलिस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.