Bhosari

चाकणमध्ये महिलेच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून

By PCB Author

July 19, 2019

चाकण, दि. १९ (पीसीबी) – रस्त्याच्या वादातून एका महिलेच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास चाकण येथे घडली.

कल्पना शितोळे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनिल हेंद्रे या आरोपीला चाकण पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्याच्या वादातून कल्पना आणि आरोपी अनिल यांचा वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि अनिलने दगडी पाटा कल्पना यांच्या डोक्यात मारला. या घटनेत गंभीर जखमी कल्पना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिलला अटक केली. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.