चाकणमध्ये भाड्याने घेतलेल ३६ लाखांचे सेंट्रींगच मटेरियल एकाने केले गायब

0
430

चाकण, दि. १७ (पीसीबी) – सेंट्रींग कामाचे तब्बल ३५ लाख ९६ हजार रुपयांचे मटेरियल एकाने कंपनीकडून भाड्याने घेतले. तसेच ते मटेरियल परत न करता कंपनीची फसवणुक केली. ही घटना चाकण येथे घडली.

याप्रकरणी मयंक सुभाष अग्रवाल (वय २५, रा. सुस, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत वामन चितारे (रा. मांजरी ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक यांचा सेंट्रींग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्यांचे नाणेकरवाडी येथे गोडाऊन आहे. श्रीकांत याने मयंक यांच्या कंपनीकडून ८ ऑक्‍टोबर ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत सुमारे ३५ लाख ९६ हजार रुपयांचे सेंट्रींग मटेरियल भाड्याने घेतले. भाड्याने घेतलेल्या मटेरियलचे भाडे न देता ते मटेरियल देखील परत केले नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.