Bhosari

चाकणमध्ये भांडण पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण

By PCB Author

December 20, 2018

चाकण, दि. २० (पीसीबी) – भांडण सुरु असताना ते पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला लोखंडी पाईपने पोटात मारुन तसेच लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकण येथील दावडमळा खराबवाडी विन्डसस्ट्रॉग कंपनीत घडली.

विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण (वय २२, रा. स्वामी समर्थ बिल्डिंगजवळ, दावडमळा, चाकण) असे मारहाण होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल अशोक इंगोले (वय २६), अशोक नामदेव इंगोले (वय ४८), नितीन रामराव उटकर (वय २७) आणि विजय अशोक इंगोले (वय २८, सर्व रा. को/ऑप रामचंद्र मोरे यांच्या खोलीत, दावडमळा चाकण) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विरबाजी चव्हाण आणि आरोपी अमोल, अशोक, नितीन, विजय हे चाकण येथील विन्डसस्ट्रॉग कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपींचे कंपनीतीच आपसात भांडण सुरु होते. हे भांडण पाहण्यासाठी विरबाजी तेथे पोहचले यावेळी चौघा आरोपींनी कारण नसताना लोखंडी पाइपन आणि लाथा-बुक्क्यांनी त्यांना जबर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, चौघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.