चाकणमध्ये भरधाव एसटी बसच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

0
830

चाकण, दि. १९ (पीसीबी) – भरधाव एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत एका वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.१५) सांयकाळी सव्वासातच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील पुणे-नाशिक हायवेवरील इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली.

बसुन सोपान कुशाबा कोळी (वय ६३, रा.मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी फौजदार दत्तात्रय शामराव जाधव चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एसटी बसचालक संजय पिलाजी रोमणे (वय ५१, रा. चेहडी, पो. दाराणा सांगवी, ता. निफाड. जि. नाशीक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बसुन कोळी हे चाकण पोलीस ठाणे हद्दीतील पुणे-नाशिक हायवेवरील इंद्रायणी नदीच्या पुलावरुन पायी चालले होते. यावेळी एसटी बस चालक संजय रोमणे याने त्यांच्या ताब्यातील एसटी (क्र.एमएच/०६/एस/८८९५) भरधाव वेगाने चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या बसुन कोळी यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाले. या घटनेत बसुन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.