Notifications

चाकणमध्ये फिल्मी स्टाईलने कार अडवून सेल्समॅनवर प्राणघातक हल्ला

By PCB Author

March 19, 2019

चाकण, दि. १९ (पीसीबी) – कंपनीतले काम अटपून कारने मोशी येथील घरी निघालेल्या एका सेल्समॅनची कार सात जणांच्या दुचाकीस्वार टोळक्यांनी आडवली. तसेच कोयता, दगड आणि लाकडी दांडक्यांनी कारची तोडफोड करुन सेल्समनला जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. ही थरारक घटना सोमवार (दि.१८) रात्री आठच्या सुमारास कुरुळी गावाच्या हद्दीतील कुरुळी फाटा येथे घडली.