Bhosari

चाकणमध्ये फिल्मी स्टाईलने कार अडवून सेल्समनवर प्राणघातक हल्ला

By PCB Author

March 19, 2019

चाकण, दि. १९ (पीसीबी) – कंपनीतले काम अटपून कारने मोशी येथील घरी निघालेल्या एका सेल्समनची कार सात जणांच्या दुचाकीस्वार टोळक्यांनी आडवली. तसेच कोयता, दगड आणि लाकडी दांडक्यांनी कारची तोडफोड करुन सेल्समनला जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. ही थरारक घटना सोमवार (दि.१८) रात्री आठच्या सुमारास कुरुळी गावाच्या हद्दीतील कुरुळी फाटा येथे घडली.

राकेश प्रकाश अत्तरदे (वय ३४, रा. सी ११०५, दअॅडरेस मोशी) असे टोळक्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या सोल्समनचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश हे चाकण येथील कंपनीत सेल्समनचे काम करतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ते कंपनीतले काम आटपून मोशी येथील घरी त्यांच्या कारने निघाले होते. ते  कुरुळी फाटा येथे आले असता तीन दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात ६ ते ७ जणांच्या टोळक्यांनी राकेश यांच्या कारवर कोयता, दांडके आणि दगडाने हल्ला चडवत कारची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच राकेश यांना दगड, दांडके आणि कोयत्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. आणि पसार झाले. सध्या राकेश यांची प्रकृती गंभीर असून त्यांना चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राकेश यांच्या हल्ला कोणी आणि का केला हे अद्याप समजुशकले नाही. चाकण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.