चाकणमध्ये पत्नीच्या मृत्यूने दुखावलेल्या पतीची गळफास घेत आत्महत्या

0
1078

चाकण, दि. १० (पीसीबी) – पत्नीचा मृत्यू झाल्याचे दुखः असहनीय झाल्याने पतीने राहत्या घराच्या छताला कापडाच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आयफेल सिटी, राणूबाईमळा, चाकण येथे घडली.

अनिलकुमार रमणिकलाल दावडा (वय ५९, सध्या रा. राणूबाई मळा, चाकण, मूळ रा. सराफबाजार राजकोट, गुजरात) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.  त्याचा मुलगा सुमित अनिलकुमार दावडा ( वय ३७) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुमित यांच्या आईचे सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते. तेंव्हापासून त्याचे वडील अनिलकुमार हे मानसिक तणावात होते. त्यातूनच त्यांनी राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करत आहेत.