Bhosari

चाकणमध्ये नऊ जणांच्या टोळक्यांकडून दोन तरुणांना मारहाण

By PCB Author

March 15, 2019

चाकण, दि. १५ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन आठ ते नऊ जणांच्या टोळक्यांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी सव्वादहाच्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.

याप्रकरणी मयूर मधुकर तरस (वय २६, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल विकास धोडगे, मंगेश महादू गाढवे, अविनाश महादू गाढवे (तिघे रा. सावरदरी, ता. खेड), अक्षय बाळासाहेब गाडे (रा. शेलू, ता. खेड) आणि त्यांचे चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी फिर्यादी मयूर आणि त्यांचे चुलत भाऊ गणेश तरस हे दोघे सावरदरी येथील लिक्विड कंपनी चौकातून त्यांच्या कारने जात होते. यावेळी वरील आरोपींनी कार आडवी लावून मयूर आणि गणेश या दोघांना अडवले. आणि लोखंडी गजाने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.