चाकणमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

0
447

चाकण, दि. २१ (पीसीबी) – शहर परिसरात दिवसेंदिवस वाहन दुर्घटनेच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये दुचाकी दुर्घनांची सख्या जास्त आहे.

पहिला अपघात रविवारी (दि.९ जून) कुरुळी गावच्या हद्दीत बर्गेवस्तीतील ओम लॉजीस्टीक कंपनीसमोर घडला. या अपघातात युवराज शंकर पाटील (वय ४८, रा. सुळंबी ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) या इमाने त्याची दुचाकी (क्र.एमएच/१४/एफएन/४९११) ही भरधाव वेगाने चालवून अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. यामध्ये युवराज यांचा मृत्यू झाला.  घटनेचा अधिक तपास फौजदार सुपेकर करत आहेत.

तर दुसरा अपघात भांबोली गावच्या हद्दीतील तवरा फॅब्रीकेशन कंपनीसमोर घडला. या अपघातात समशेर विजय चौहाण (वय २५, रा. थेरगाव, चिंचवड) या तरुणाने त्याची दुचाकी (क्र.एमएच/१४/डीव्ही/९०६१) ही भरधाव वेगाने चालवून अज्ञात वाहनाला मागून धडक दिली. यामध्ये समशेर याचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पासलकर करत आहेत.