चाकणमध्ये दोघा वाहन चोरट्यांना आठ दुचाक्यांसह अटक

0
1072

चाकण, दि. ११ (पीसीबी) – दोघा वाहन चोरट्यांना चार लाखांच्या आठ दुचाक्यांसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.

आकाश राजाभाऊ शिंदे (वय १९, रा. जंबुकरवस्ती, खराबवाडी, चाकण) आणि अक्षय अनिल लोमटे (वय १९, रा. जंबुकरवस्ती, खराबवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या दोघा दुकचाकी चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी गस्तीवर होते. यावेळी पोलीस नाईक सचिन उगले यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, सराई वाहन चोर आकाश शिंदे हा चाकण बाजारपेठ येथे येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार अक्षय लोमटे याच्यासोबत मिळून सात दुचाक्या चोरल्याचे कबुल केले. पोलीसांनी त्यानुसार अक्षय याला अटक करुन एकूण ४ लाख रुपये किमतीच्या आठ दुचाक्या जप्त केल्या. यामुळे चाकण, निगडी, तळेगाव एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजु केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.