Bhosari

चाकणमध्ये जीप आणि कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By PCB Author

June 26, 2019

चाकण, दि. २६ (पीसीबी) – ओव्हरटेक करण्याच्या नादात जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील दोघांचा मृत्यू झाला. तर जीपचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री उशीरा चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील भोसे येथे घडली.

वल्लभ अर्जुन रावता (वय ४५ रा.कल्याण, मुंबई)  आणि संजय गीताराम वाल्मीक (वय ४५ , रा. पनवेल, जि.रायगड) असे मृत दोघांची नावे असून बोलेरो जीप चालक दीपक गणपत गोसावी (वय ३७, रा. पनवेल, जि. रायगड)  हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.